पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह? Who is the first Sikh MP to enter the upper house of Pakistan, Gurdeep Singh?

Share This News

सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’चे (PTI) नेते गुरदीप सिंह (Gurdeep Singh) यांनी शुक्रवारी (12 मार्च) खासदार म्हणून शपथ घेतली. यासह ते पाकिस्तानच्या संसदेच्या (Pakistan’s Parliament) वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख (Turban-clad Sikh) ठरले. सिंह यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या (Upper House) निवडणुकीत खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) या अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केलाय (Gurdeep Singh elected as first shikh member of Pakistan Parliament upper house).

गुरमीत सिंह यांना या निवडणुकीत 145 पैकी 103 मतं मिळाली. दुसरीकडे त्यांचे विरोधी उमेदवार जमीयत उलेमा-ए इस्लामचे (फजलुर) नेते रणजीत सिंह (Ranjeet Singh) यांना केवळ 25 मतं आणि अवामी नॅशनल पक्षाच्या आसिफ भट्टी (Asif Bhatti) यांना केवळ 12 मतं मिळाली. सिंह यांच्याशिवाय पाकिस्तानच्या संसदेत आणखी 47 खासदारांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. सिंह पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यातील (Swat) रहिवासी आहेत. ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरलेत.

अल्पसंख्यांक समुहाच्या भल्यासाठी काम करणार : गुरमीत सिंह

शपथ घेतल्यानंतर सिंह म्हणाले, “मला देशातील अल्पसंख्यांक समुहाच्या विकासासाठी काम करायचं आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा प्रतिनिधी या नात्याने मला या समुहाची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल.” याआधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक उमेदवारांची 5 मतं नाकारण्यात आल्याची माहिती दिली होती. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान (Mehmood Khan) यांनी गुरमीत सिंह यांना 102 मतं मिळतील असा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यांना एक अधिकचं मत मिळालं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.