फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

Share This News

प्रसन्न जकाते, नागपूर


विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे. कोण आहे तन्मय, त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय संबंध जाणून घेऊ या….
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. तन्मय यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. चाचा विधायक है हमारे या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.
तन्मय हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा पुतणे. अभिनेता असल्याचा उल्लेख त्यांनी ट्विटरवर केला आहे. नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन आहे.

लस कशी भेटली?


तन्मय फक्त २३ वर्षांचे आहेत. त्यांनी कोणत्या बाबी नमूद करून लस घेतली याचा शोध घेणे आता नितांत गरजेचे झाले आहे. तन्मय याने कोणत्या क्षेत्राचा उल्लेख करीत लस घेतली याचा शोध घेण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. तन्मयच्या लसीकरणाच्या मुद्दा करून त्याला व फडणवीस यांना कायद्याच्या कचाट्यात पकडता येते का, याचेही प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहे. अशात भाजप फडणवीस यांच्या पाठीशी उभी झाली आहे. तन्मय दूरचा नातेवाईक आहे असे ट्विट करीत भाजपचे केशव उपाध्याय यांनी फडणवीसांनी पाठराखण केली आहे. तन्मयच्या सर्व सोशल मीडिया खात्यांवर त्याचे व फडणवीस यांचे अनेक फोटो आहेत. दरम्यान तन्मय यांने चुकीच्या मार्गांचा अवलंब करीत लसीकरण करून घेतले असल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई होणेही गरजेचे आहे हे नक्कीच.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.