४ फेब्रुवारीला निकाल कोण होणार ‘सरपंच’
नागपूर
राज्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. गावकारभारी निवडल्या गेलेत, परंतु अद्यापपर्यंत सरपंचपदी कुणाची वर्णी लागणार हे निश्चित झालेले नाही. आता सरपंच पदासाठी येत्या ४ फेब्रुवारी रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ७६८ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार असून यात नुकत्यात झालेल्या १३0 ग्रामपंचायतींचासुद्धा समावेश आहे. हे आरक्षण वर्ष २0२0 ते २0२५ पर्यंतसाठी राहणार असल्याचे सांगण्यात येते.
राज्यात निवडणुकीपूर्वीच अनेक ठिकाणच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. परंतु ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व आरक्षण रद्द करीत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरही बरीच टीका झाली. सरपंच पदाचे आरक्षण रद्द झाल्यानंतर परिणामाची माहिती विभागाकडून घेण्यात आली. अनुसूचित जमातीचा सदस्य नसताना सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे निघाल्यास मोठी अडचण होणार आहे.
सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे निघाले आणि बहुमत असलेल्या गटाकडे त्याचे प्रतिनिधीत्व नसल्यास मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालीचा अधिसूचना २९ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी