सुमित्रा महाजनांच्या निधनाचं ट्विट, बेजबाबदार थरूरांना नडली अतिघाई!

Share This News

नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. परंतु त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलीय. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु कैलास नावाच्या ट्विटर युजर्सने सुमित्राताई स्वस्थ असल्याचं रिट्विट करून त्यांना सांगितलं. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या माहितीचं ट्विट डिलीट केलं.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.