मंगळावर दडलाय पाणीसाठा! नासाच्या शास्त्रज्ञांनी उलगडले रहस्य Why are the vaccination centers not functioning yet?

Share This News

अब्जावधी र्षापूर्वी मंगळ ग्रहावर मोठमोठे तलाव, सरोवर आणि विशाल समुद्र होते. मात्र काळासोबत हा सगळा जलसाठा गायब झाला. मंगळावरचं पाणी गेलं कुठे, हा शास्त्रज्ञांसमोर गहन प्रश्न आहे. मात्र आता त्याचे उत्तर शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. नासाच्या नव्या संशोधनानुसार, सध्या मंगळ ग्रहावर 33 ते 99 टक्के पाण्याचा साठा लपलाय. हे पाणी मंगळ ग्रहाबाहेरील आवरणात असलेल्या खनिज पदार्थांमध्ये दडलेले आहे.

आतापर्यंत संशोधकांचे असे म्हणणे होते की, मंगळ ग्रहावरील कमी गुरुत्वाकर्षणामुळे तिथले पाणी वातावरणात उडून गेले. मात्र अशा पद्धतीने मंगळ ग्रहावरील सर्व पाणीसाठा संपलेला नाही, अशा निष्कर्षापर्यंत आता संशोधक पोचले आहेत. कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी आणि नासाचे जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी यांनी केलेल्या अभ्यासानुसार,  चार अब्ज वर्षांपूर्की अख्ख्या ग्रहावर पसरलेला एवढा पाणीसाठा (100 ते 1500 मीटर खोल समुद्र) मंगळावर होता. कालांतराने तो आटत गेला.

कसा लागला शोध

मंगळावरील पाण्याचे रहस्य शास्त्रज्ञांनी नासाच्या प्लेनेटरी डेटा सिस्टिमच्या मदतीने उलगडले आहे. रोव्हर आणि मंगळ ग्रहाभोवती फिरणाऱया उपग्रहांचा डेटादेखील घेण्यात आला आहे. अंतराळातून पृथ्वीवर कोसळलेल्या उल्कापिंड, त्यावरील हायड्रोजनचा अभ्यास करण्यात आला आहे. मंगळावरील पाण्याची तीन रुपे (वाफ, द्रव्य आणि बर्फ) तसेच पृष्ठभाग आणि वातावरणातील केमिकल घटक यांचादेखील शास्त्रज्ञांनी अभ्यास करून निष्कर्ष काढला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.