पत्नी खर्रा खाते म्हणून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही हायकोर्टाचा निर्णय

Share This News

पतीला खर्रा खाण्याचे व्यसन

असणे ही अतिशय गंभीर बाब आहे. परंतु, एकमेव या कारणावरून पतीला घटस्फोट मंजूर केला जाऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती द्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी एका प्रकरणात दिला दिला

या प्रकरणातील दांपत्य शंकर व रिना है नागपूर येथील रहिवासी असून, त्यांचे १७ जून २००३ रोजी ल झाले आहे. शंकरला रिनाच्या करतेच्या आधारावर घटस्फोट हवा होता. रिना घरातील दैनंदिन कामे करीत नाही. कुल्लक कारणावरून भांडण करते. कुणालाही न सांगता माहेरी जाते व तेथे एकेक महिना राहते. रोज टिफिन तयार करून देत नाही.ती १७ जानेवारी २०१२ रोजी विभक्त झाली व कायदेशीर नोटीस बजावल्यानंतरही परत आली नाही. तिची संसार करण्याची इच्छा नाही तसेच तिला खरा खाण्याचे व्यसन आहे. त्यामुळे तिच्या पोटाच्या आजारावर उपचार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला असे आरोप शंकरने घटस्फोट मिळवण्यासाठी केले होते. उच्च न्यायालयाने खर्रा खाण्याचे व्यसन वगळता इतर आरोप सामान्य स्वरूपाचे आहेत आणि सदर किरकोळ वाद संसारात घडत राहतात, असे मत व्यक्त केले, पली वर्र खाते हा आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने सांगितले; पण एकमेव त्या कारणावरून घटस्फोट दिला जाऊ शकत नाही असेही स्पष्ट केले.शंकरने घटस्फोट मिळवण्यासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालया याचिका दाखल केली होती.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.