वन्यप्रेमींनी दिले हरणाला जिवनदान Wildlife gave life to the deer

Share This News

चिचगड,दि.१६: नैसर्गिक वनसंपदेने नटलेल्या देवरी तालुक्यात वन्यप्राणी नेहमीच संचार करतांना बघावयास मिळतात.उन्हाळ्याची चाहुल लागताच आणि जंगलात वनवे लागल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात लोकवस्ती कडे धाव घेत असतात त्यामुळे संधी साधुन गावातील कुत्रे शिकार करण्याच्या उद्देशाने हरिण आणि इतर प्राण्यावर झपटतात.

अशाच प्रकार आज देवरी शेजारील शेडेपार मार्गावर बघावयास मिळाला सकाळी ७:३० च्या सुमारास देवरीतिल युवक क्रिकेट खेळत असतांना तहानलेला हरिण तलावा शेजारी पाणी पीत असतांना अचानक कुत्रे बारासिंगा हरिणाचा पाठलाग करतांना दिसले जखमी झालेल्या हरिणाला सर्व वन्यप्रेमी युवकांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडवुन त्याला सुरक्षित ठिकाणी आनले आणि वनविभागाला सूचना दिली.माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि वन्यप्रेमी युवकांनी हरिणाला त्यांच्या स्वाधीन केले.यामढे ओमप्रकाश रामटेके माजी नगरसेवक, राहुल मोहुर्ले, ज़फ़र कुरेशी, लक्ष्मण झिंगरे, प्रशांत भेलावे , भूषण गायधने, मुन्ना लामकासे , सोनू शाहू आदि वन्यप्रेमीचा समावेश होता.

जखमी हरिणावर पशु संवर्धन वैद्यकीय अधिकारी देवरी उपचार केला परंतु उपचारादरम्यान हरिणाचा मृत्यु झाल्याचे वनविभागाचे अधिकारी चोपडे यांनी  प्रतिनिधीला माहिती दिली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.