रोजी-रोटी जाईल असा निर्णय घेणार नाही : नितीन राऊत

Share This News

उर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नागपूरमध्ये राज्य सराकारचे प्रोटोकॉल लागू राहतील. राज्य सरकारने सांगितलेले नियम येथे लागू नसतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिलीय. कोणाचीही रोजी-रोटी जाईल असा निर्णय राज्य सरकार घेणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी यावेळी जनतेला दिली. नागपुरात कोरोना रुग्णांमध्ये रोज हजारोंच्या संख्येने वाढ होत आहे. तसेच येथे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडासुद्धा मोठा आहे.
नागपुरात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे येथे बेड्सची कमतरता भासत आहे. ग्रामीण भागात बेड्सची कमतरता भासत असेल तर तेथेसुद्धा खाटा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे राऊत म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.