आता आठवड्यात 4 दिवस काम अन् 3 दिवस सुट्टी मिळणार?; केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

Share This News

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून नोकरदार वर्गामध्ये आठवड्याचे कामकाज हे 4 दिवस (4 days in a Week)  आणि 3 दिवस सुट्टी मिळू शकते अशी जोरदार चर्चा रंगली होती. केंद्र सरकार (Government of India) याबाबतीत योजना आखत असल्याचं देखील म्हटलं जात होतं. आठवड्याचे दिवस कमी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांकडून जास्त वेळ काम करून घेण्याची मुभा कंपन्यांना मिळणार होती अशीही चर्चा होती. मात्र आता केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार (Santosh Gangwar) यांनी अशाप्रकारे सुरू असणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अशा प्रकारचा बदल करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं गंगवार यांनी सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत एका प्रश्नाला लिखित स्वरुपात उत्तर देताना याबाबत माहिती दिली आहे. कार्यालयांमध्ये आठवड्यातून 4 दिवस काम किंवा 40 तासांच्या कामाच्या व्यवस्थेबाबत कोणतीही योजना नाही असं गंगवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कामगार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या वेतन आयोगाच्या सूचनेच्या आधारे आठवड्यातून पाच दिवस आणि भारत सरकारच्या नागरी प्रशासकीय कार्यालयांमध्ये दररोज साडेआठ तास काम केले जाते. सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) देखील आपल्या शिफारशीत हे कायम ठेवले आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.