भाजप आमदारांची मागणी.

Share This News

कोरोनाची खबरदारी घेऊन हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या . आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Winter session should be held in Nagpur Demand from BJP MLA)

नागपूर :  नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, अशी मागणी नागपूर जिल्ह्यातील भाजप आमदारांनी केली आहे. त्यामुळे आता या आमदारांच्या मागणीवर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Winter session should be held in Nagpur Demand from BJP MLA)

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. तर काही कार्यक्रम हे ऑनलाईन पार पडत आहे. येत्या सात डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. मात्र कोरोनामुळे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी हे अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी मागणी केली होती. या मागणीला भाजप आमदारांनी विरोध दर्शवला आहे.

नागपूर कराराप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घ्या, अशी मागणी भाजप आमदारांनी केली आहे. नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे, समीर मेघे, मोहन मते, प्रविण दटके यांनी याबाबतची मागणी केली आहे. कोरोनाची संपूर्ण खबरदारी घेऊन हे अधिवेशन नागपुरात घ्यावं, असेही भाजप आमदार म्हणाले. तसेच मुंबईत अधिवेशन घेण्याच्या हालचालीमुळे हे सर्व भाजप आमदार नाराज असल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान नागपुरात सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पण कोरोनामुळे अधिवेशन होणार की नाही, याचा निर्णय सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. पण सध्या नागपुरात अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. कोरोनामुळे राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार निवासात रंगरंगोटी सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी अधिवेशनासाठी आमदार निवासात रंगकाम करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास पावणे दोन कोटींचा खर्च करण्यात आला होता. यंदाही यासाठी आठ कोटींचा खर्च करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. संच अधिवेशनादरम्यान कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय करण्यात आली आहे.  मात्र हिवाळी अधिवेशन नेमकं कुठे होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.