सासरच्या मंडळीकडून होणार्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

Share This News

बुलडाणा,दि.06 – जिल्ह्यातील बेलगाव गावात एका विवाहितेने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आज सकाळी समोर आले. गेल्या काही दिवसांपासून संबंधित महिलेचा प्रचंड प्रमाणात शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्त्या केल्याचे समोर आले आहे.

या घटनेमधील मृत महिलेचं नाव प्रतिक्षा वानखेडे असं आहे तर आरोपी पतीचं नाव गजानन वानखेडे असं आहे. प्रतिक्षाच्या सासरच्या मंडळीला जेसीबी खरेदी करण्यासाठी पैश्यांची गरज होती. यासाठी त्यांच्या सुनेनं तिच्या माहेरुन १० लाख रुपये आणावे म्हणून त्यांनी प्रतिक्षाचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला. सासरच्या मंडीळीच्या जाचाला कंटाळून काल रात्री प्रतिक्षाने तिच्या राहत्या घरी गळफास लावून तिचं जीवन संपवलं.

या संपुर्ण प्रकारची माहिती आज सकाळी समोर आली आहे. यानंतर प्रतिक्षाच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. यामध्ये प्रतिक्षाचा पती, तिचे सासू-सासरे यांच्यासह मनिषा आणि अश्विनी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यांना पोलिसांनी अटक देखील केली आहे.

दरम्यान, ही घटना बुलडाणा मधील डोणगावाच्या शेजारील गावात घडली असून काही दिवसांपुर्वी डोणगाव येथे एका 12 वर्षाच्या चिमुकल्याने देखील आपलं जीवन संपवलं. यादरम्यान त्याने विष पिऊन आत्महत्या केलं असल्याचं समोर आलेलं. अर्थात बुलडाण्यामध्ये एक शोकांतिका पसरलीच होती की त्यातच आता आणखीन एक दुखःद प्रसंग घडला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.