चंद्रपुर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

Share This News

चंद्रपूर 31 मार्च चंद्रपूर वनविभागात बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली. चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील जानाळा नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ७१५ मध्ये कल्पना नामदेव वाडई (५५) ही महिला मोहफुले गोळा करण्यासाठी गेली होती. त्यावेळी वाघाने अचानक तिच्यावर हल्ला करीत जागीच ठार केले. माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. परिसरात गस्त वाढविण्यात आली असून गावकऱ्यांना जंगलात न जाण्याच्या सूचना देण्यात आलेले आहेत. परिसरात गस्ती पथक नेमले आहे. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.