महिलांनी स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकावे- न्या. अंजू शेंडे Women should learn to make their own decisions – Justice. Anju Shende

Share This News

भंडारा, दि.13 : सक्षम व खंबीर महिला म्हणून समाजात उभे राहायचे असेल तर महिलांनी छोटे मोठे निर्णय स्वत: घ्यायला शिकले पाहिजे. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून महिलांच्या प्रगती शिवाय देशाची प्रगती शक्य नाही. तेव्हा आता निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, कौटूंबिक न्यायालय भंडारा व जिल्हा माहिला बालविकास कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा येथे जागतिक महिला दिवस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंजू शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

न्यायाधीश कौटूंबिक न्यायालय श्रीमती अनिता शर्मा, जिल्हा न्यायाधीश- 1 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे, दिवाणी न्यायाधीश एम. ए. कोठारी, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एच. कर्वे, सह दिवणी न्यायाधीश डी.जे. एडाईत, दुसरे सह दिवणी न्यायाधीश एस.पी. भोसले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न. के. वाळके, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय विधी सल्लागार अमिता खोब्रागडे, अधिवक्ता मंजूषा गायधने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न. के. वाळके यांनी केले व शिक्षणच स्त्री उध्दाराचे व समाजपरिवर्तनाचे साधन आहे म्हणून मुलींना शिक्षण देणे फार गरजेचे आहे. नुकसान भरपाई योजना व मनोधैर्य योजना बद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले. जिल्हा महिला व बालविकास कार्यालय विधी सल्लागार अमिता खोब्रागडे यांनी कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या अधिनियमाबाबत तसेच विविध शासकीय योजनांबद्दल मार्गदर्शन केले. अधिवक्ता मंजूषा गायधने यांनी हुंडा प्रतिबंध अधिनियम तसेच महिलांची कामाच्या ठिकाणावर होणारी लैंगिक पिळवणूक अधिनियम याबाबत मार्गदर्शन केले.

अनिता शर्मा यांनी महिलांना सन्मान देणे हाच नारीशक्तीचा आदर आहे. महिलांचा फक्त आठ मार्च लाच आदर न करता प्रत्येक दिवशी नारीशक्तीचा आदर करायला पाहीजे असे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता नेहा गजभिये यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी केले. कार्यक्रमात जवळपास 50 जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, बाल कल्याण समिती, चाईल्डलाईन तसेच भरोसा सेल चे अधिकारी कर्मचारी तसेच विधी स्वयंसेवक उपस्थित होते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.