जागतिक आरोग्य संघटना भारताच्या मदतीला

Share This News

जगभरातील मदतीमुळे दिलासा

जगभरातील इतरही अनेक देशांनी भारताला मदत पाठवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, र्जमनी, सौदी अरेबिया आदी अनेक देशांचा समावेश आहे. या देशांनी ऑक्सिजन मशीन्स, औषधे आदी मदत भारताला पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात उद्भवलेली परिस्थिती हृदयद्रावक आहे. हे संकट दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्वतोपरी मदत करत असल्याचे संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयसेस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारतातील परिस्थितीबाबत त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. महत्त्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात असून आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आले आहेत. भारताला हजारो पोर्टेबल ऑक्सिजन मशीन्ससह आवश्यक ती सर्व साधन सामग्री पाठवण्यात येत असल्याचे घेब्रेयसेस यांनी स्पष्ट केले.
जागतिक पातळीवर कोरोनाची स्थिती गंभीर होत असून गेल्या नऊ आठवड्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. तसेच गेल्या सहा आठवड्यांपासून मृतांची संख्याही वाढत असल्याचे घेब्रेयसेस यांनी सांगितले. जागतिक पातळीवर मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यात जेवढे कोरोना रुग्ण आढळले तेवढे रुग्ण गेल्या एका आठवड्यात आढळले असल्याचंही त्यांनी नमूद केले. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढत असून दररोज सरासरी तीन लाख रुग्ण आढळत आहेत. सध्या भारतात अत्यंत विदारक स्थिती उद्भवली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत सध्या जगात चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून तिथे आतापयर्ंत या आजाराने पाच लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर ब्राझील आणि मेक्सिको इथे सर्वाधिक रुग्ण आहेत. अशा परिस्थितीत भारताला मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचं टेड्रोस यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.