सोसाट्याचा वारा, जोराचा पाऊस; 5 मुलांवर वीज कोसळली, सर्वांची प्रकृती गंभीर

Share This News

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील दत्तापूर येथे अंगावार वीज पडून 5 लहान मुलं गंभीर जखमी झालीयेत. ही मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी अचानक पाऊससुरु झाल्यामुळे झाडाखाली थांबल्यानंतर मंगळवारी (23 मार्च) ही दुर्दैवी घटना घडली. पाचही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुलं झाडाखाळी थांबली आणि वीज कोसळली

मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस तालुक्यात दत्तापूर येथे पाच लहान मुलं बकऱ्या घेऊन शेतात गेले होते. यावेळी या परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जोराचा पाऊस सुरु असल्यामुळे अंग भिजू नये म्हणून ही पाचही मुलं एका झाडाखाली उभी राहिली. मात्र, यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत पाचही मुलं गंभीर जखमी झाली आहेत. राम भट, आहु शेळके, संतोष शेळके, वांशिका साळवे, मंगेश टाले असे जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत.

दरम्यान घटनेची माहिती होताच, जखमी मुलांच्या कुटुंबियांनी मुलांकडे धाव घेतली. या मुलांना उपचारासाठी सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या पाचही मुलांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.