यवतमाळ : आगीत शेतातील तुरीची गंजी जळून खाक
महागाव- तालुक्यातील हिवरा संगम येथे सुधीर दादाराव कदम यांच्या शेतातील ३ एकर तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तुर पिकाचे उत्पन्न घेऊन कदम यांनी तूर शेतात वाळवण्यासाठी ठेवली असता आज या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून या पिकाची राख रांगोळी केली. यात कदम यांचे अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुक निकालाची किनार या घटनेला असल्याची चर्चा आहे. सदर झालेल्या प्रकाराची तक्रार सुधीर कदम यांनी महागाव पोलिस स्टेशनला दिली