लग्नासाठी युवकाने लावला गळफास

Share This News

गोंदिया : घरचे लोक लग्न करून देत नाही यासाठी आमगाव तालुक्यातील एका 25 वर्षीय युवकाने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल रात्री उशिरा उघडकीस आली. घरचे लग्न करून देत नाही, यामुळेच त्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटूंबियांनी दिली आहे.

फुक्कीमेटा येथील 25 वर्षीय युवकाने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मृत युवकाला दारू पिण्याची सवय जडली होती. तो नेहमी दारू पिऊन घरी येऊन घरच्यांशी भांडण करायचा आणि आपल्या आई-वडिलांना माझे लग्न का करून देत नाही, असे बोलून भांडत करायचा. दोन-तीन दिवसाआधी त्याने या गोष्टीवरून आपल्या आई-वडिलांसोबत खूप भांडण करत मारहाण केली होती. त्याच्या अशा वागणुकीमुळे मृताचे आई वडील घरी राहत नव्हते. काल रात्री मृत युवकाने स्वतःच्या घराच्या खोलीमधील खांबाला दोरी बांधून गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.