ब्रॉडगेज मेट्रोसाठी तरुणांनी पुढे यावे

Share This News

नागपूर
नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. रस्ते, उड्डाणपूल, पाणी, वीज, गरिबांना घरे, शिक्षण, आरोग्य अशी सर्वच कामे सुरू असून, शहराच्या सर्व भागांचा विकास करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपूरच्या ब्रॉडगेज मेट्रोसाठी नागपूर, विदर्भातील तरुण उद्योजकांनी पुढे यावे. मी त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यास तयार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
वर्धा रोड ते उमरेड रोडला जोडणार्‍या वंजारीनगर पाण्याची टाकी ते अजनी रेल्वे स्टेशन या रस्त्याचे उद््घाटन शनिवारी (ता. २३ जानेवारी) गडकरी यांच्या हस्ते झाले. वंजारीनगर उड्डाणपुलाजवळ या रस्त्याचे उद््घाटन झाले. कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी, आ. मोहन मते, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुं भारे, आ. प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे उपस्थित होते. अजनी येथे आता ८00 हेक्टर जागेत सर्वात सुंदर स्टेशन उभारण्यात येत आहे. सर्व मार्गांनी जाणार्‍या बस या स्टेशनला जोडल्या जाणार आहेत. जागा रेल्वेची आहे. त्यामुळे रेल्वेच्या कर्मचार्‍यांना आजच्यापेक्षा चांगले क्वार्टर आणि शाळा बांधून देण्यात येईल. तसेच नागपूर उमरेड ४ पदरी रस्ता मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या वाढीव कामासाठी ५५ कोटी रुपये मंजूर झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. दरम्यान, ब्रॉडगेज मेट्रोने चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, छिंदवाडा, बैतूल, रामटेक अशी सर्व गावे जोडली जाणार आहेत. ३0 मेट्रो आपण घेत आहोत. ३६ कोटी रुपयांची एक मेट्रो असून ती घेण्यासाठी एमएसएमईतून मी कर्ज देण्यास तयार आहे. नागपूर व विदर्भातील तरुण उद्योजक तरुणांनी पुढे यावे. मी त्यांना सर्वप्रकारे सहकार्य करण्यास तयार आहे. संपूर्ण मेट्रो वातानुकूलित राहील. इकॉनॉमी व बिझनेस क्लास यात राहतील. रेस्टॉरंट राहील, टीव्ही राहील आणि एसटीच्या बरोबरीने तिकीट राहील. नागपूर भोवतालची सर्व गावे यामुळे विकसित होणार असल्याचे गडकरी यांनी भाषणात नमूद केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.