गडचिरोलीत नक्षल्यांकडून युवकाची हत्या

Share This News

गडचिरोली : अलीकडचे झालेल्या पोलिस कारवाईमुळे चिडलेल्या नक्षल्यांनी पोलिस विभागासाठी एसओपी म्हणून काम करणाऱ्या युवकाची गोळ्या घालून हत्या केली. पुरसलगोंदीत ही घटना घडली.
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या एका कॅम्पवर हल्ला केला होता. पोलिसांचा वाढता दबाव पाहता नक्षलवादी येथे साहित्य टाकत पळुन गेले होते. या प्रकाराचा वचपा काढण्यासाठी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या एसओपीची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी नक्षलवादी पुरसलगोंदीत पोहोचले. त्यांनी अशोक कुरचामी यांना गाठत त्यांची गोळ्या घालून हत्या केली. अहेरी तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक हे पुरसलगोंदीत सासरी आले होते असे गडचिरोली पोलिसांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. अशोक हे गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसाठी काम करीत नव्हते. त्यानंतरही नक्षलवाद्यांच्या ‘अॅक्शन टीम’ने त्यांची हत्या केली. याप्ररकणी गडचिरोली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.