जिल्हा परिषदेकडे मृत्यूची नोंदच नाही?

Share This News

नागपूर
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोचा प्रकोप वाढत आहे. पूर्वी ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होती होत. मात्र आता ग्रामीणमध्येही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. मात्र जिल्हा परिषदेकडे मृत्यूची नोंदच नसल्याची धक्कादायक बाब आता पुढे आली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत आहे. जिल्ह्यात रुग्णांना दाखल करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड नाही. सर्व मोठी हॉस्पिटल शहरात असल्याने रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक शहराकडे धाव घेतात. मात्र शहरातही रुग्णांना बेड मिळत नाही. अन्य सोईसुविधांचीही वाणवा आहे. जिल्हा परिषदेच्या क्षेत्राअंतर्गत होणार्‍या जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आहे. यासाठी एका कर्मचार्‍याची नियुक्तीही करण्यात येते. शासन व जिल्हा परिषदकडून उपयायोजना करताना या नोंदीची माहिती होते. शिवाय यामुळे जन्म व मृत्यूबाबतची माहितीही शासनाला मिळते. एखाद्या भागात मृत्यूचा आकडा वाढल्याचे समोर आल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना सुरू करण्यात येते. सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरात रोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. ग्रामीण भागातील स्थिती शहरापेक्षा बिकट आहे. रुग्णालयात होणार्‍या मृत्यूची नोंद होत असली तरी घरी होणार्‍या मृत्यूच्या नोंदी होतात का? हा प्रश्नच आहे. ती आकडेवारी तर अधिक असण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात मृत्यू होणार्‍यांची नोंदच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जन्म-मृत्यूची नोंद ठेवण्याची जबाबदारी एका बाबूकडे आहे. दोन महिन्यांपूर्वी संबंधित बाबू नवृत्त झाला. त्यानंतर दुसर्‍या कर्मचार्‍याकडे याची जबाबदारीच देण्यात आलेली नाही, हे विशेष.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.