यवतमाळ- YAWATMAL जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नेर, बाबुळगाव, दिग्रस, दारव्हा या तालुक्यात 17 हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी जमीन खरडून गेली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने पालकमंत्री तर शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मात्र, तलाठी, मंडळ अधिकारी अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी पाहणी करून ताबडतोब शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घोषणा केल्या आहेत. पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? असा सवाल सुद्धा यावेळेस शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.Will not be able to come to office for 5-6 days