आजचे पंचांग 24 मे 2023

0

🕉 || सुप्रभात ||
बुधवार, मे २४, २०२३ युगाब्द : ५१२५
भारतीय राष्ट्रीय सौर *दिनांक आज सौर ज्येष्ठ ३ शके १९४५

सूर्योदय : ०६:०१ सूर्यास्त : १९:०९
चंद्रोदय : ०९:४४ चंद्रास्त : २३:२८
शक सम्वत : १९४५ शोभन
ऋतू : ग्रीष्म
चंद्र माह : ज्येष्ठ
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : पञ्चमी – ०३:००, मे २५ पर्यंत
नक्षत्र : पुनर्वसु – १५:०६ पर्यंत
योग : गण्ड – १७:२० पर्यंत
करण : बव – १३:५६ पर्यंत
द्वितीय करण : बालव – ०३:००, मे २५ पर्यंत
सूर्य राशि : वृषभ
चंद्र राशि : मिथुन – ०८:२७ पर्यंत
राहुकाल : १२:३५ ते १४:१४
गुलिक काल : १०:५७ ते १२:३५
यमगण्ड : ०७:४० ते ०९:१८
अभिजितमुहूर्त : कोई नहीं
दुर्मुहूर्त : १२:०९ ते १३:०२
अमृत काल : १२:२८ ते १४:१३
वर्ज्य : ००:०२, मे २५ ते ०१:४९, मे २५

राष्ट्रकुल परिषद ( Commonwealth of Nations) ही एक अशी आंतरराष्ट्रीय संघटना आहे ज्या मार्फत विविध सामाजिक, राजकीय व अर्थव्यवस्था असलेले देश एकत्र येऊन समान तत्वे व मुद्दांवर काम करतात, लोकतंत्र, मानव हक्क, चांगले सरकार, न्याय, व्यक्तिगत स्वातंत्र, खुला व्यापार व जागतिक शांती साठी काम करणे ही ह्या संस्थेची ध्येय आहेत.

आज राष्ट्रकुल दिवस आहे

संगीतकार बुलो सी. रानी – ६ मे १९२० रोजी पाकिस्तानातील हैदराबाद येथे बुलो सी. रानी यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव बुलो चंदीराम रामचंदानी. सिंधी समाजात जन्माला आलेल्या बुलो चंदी रमानी यांनी आडनावाचं इंग्रजी आद्याक्षर ‘सी’ वेगळं काढलं व ‘रमानी’चं ‘रानी’ करून टाकलं. त्यामुळं अनेकांना हा पुरुष संगीतकार की स्त्री संगीतकार असा प्रश्न पडे. बुलो सी. रानी यांचे वडीलही संगीतकार होते. ४० ते ६० च्या दशकात त्यांनी संगीत दिले.

बुलो सी. रानी यांनी १९३९मध्ये रणजित मूव्हिटोनपासून आपली सुरुवात केली. खेमचंद प्रकाश यांना असिस्टंट म्हणून मदत करायला सुरवात केली. खेमचंद प्रकाश यांच्या तानसेन, चांदनी, सुखदुख या चित्रपटांना त्यांनी असिस्टंट म्हणून काम केले.

त्या काळी बुलो. सी. रानी अमीरबाई कर्नाटकी यांच्या आवाजाने इतके प्रभावित होते की आपल्या पुढील चित्रपटांसाठी इतर कोठल्या गायिकेचा विचार करण्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या १९४४ साली आलेल्या ‘कारवाँ’ चित्रपटातील धिम्या लयीतील ‘सूनी पडी है प्यार की दुनिया तेरे बगैर जली हुई है दिल में तमन्ना, तेरे बगैर’ या गाण्यातील अमीरबाईंचा एकेक स्वर मनात साठवून ठेवण्यासारखा आहे.

• १९९३: जुन्या पिढीतील संगीतकार व गायक बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी यांचे निधन. (जन्म: ६ मे , १९२०)

पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ – सैद्धांतिक अभ्यास व चिंतन यांना दऱ्याखोऱ्या, नद्या, वने, अशा क्षेत्रांत हिंडून प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत असत. भारतातील पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय आणि विदेशांतील उत्तर दक्षिण अमेरिका जोडणारा पनामा, उत्तर-पूर्व अमेरिकेतील न्यू इंग्लंड, ॲरिझोना, पूर्व आफ्रिका येथे गाडगीळांनी अभ्यासासाठी प्रवास केला.

सत्तावीस विज्ञान महाविद्यालये, अनेक विज्ञान संस्था आणि विभाग, स्थानिक लोक आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने सहा राज्यांतील दीड लाख चौ. किमी एवढ्या विस्तृत पश्चिम घाटाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात त्यांचे प्रशासकीय कौशल्यही दिसले.

गाडगीळांनी आयुष्यात अनेक पारितोषिके, पुरस्कार, सन्मान मिळवले. त्यातील काही महत्त्वाचे नागरी पुरस्कार म्हणजे भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री आणि पद्मभूषण, आय.सी.एस.एस.आर. तर्फे विक्रम साराभाई पुरस्कार आणि पर्यावरण संरक्षणासाठी दिला जाणारा प्यू (PEW) विद्वत्ता पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

द एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूटने (TERI – पूर्वीचे नाव टाटा एनर्जी रिसर्च इंस्टिट्यूट) प्रमुख म्हणून गाडगीळांना आणि त्यांच्या पश्चिम घाट परिस्थितिकी तज्ज्ञ समिती सदस्यांना ( WGEEP, गाडगीळ कमिशन) पुरस्कार दिला. तो निकोलस रोजन यांच्या स्मरणार्थ पर्यावरणाबद्दल जीवअर्थशास्त्रासंबधी चाकोरीबाह्य विचार व कृती करणाऱ्या आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी असतो. सदर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीने गाडगीळांना पर्यावरणशास्त्रातील कामगिरीसाठी टायलर पुरस्कार दिला. त्यासाठी झालेल्या त्यांच्या नामांकन शिफारसपत्रात गाडगीळांनी भारतात पर्यावरण क्षेत्रात केले तेवढे कार्य अन्य कोणी केलेले नाही असे नोंदले आहे.

१९४२: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.

घटना :
१६२६: पीटर मिन्युईटने स्थानिक लोकांकडून मॅनहटन बेट २४ डॉलरला विकत घेतले.
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

• मृत्यू :
• १९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च ,१९०१)
• २०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९)

जन्म :
१९२२ : ओडिसा साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय लेखक आणि शैक्षणिक गोकुलानंद महापात्रा यांचा जन्म . (मृत्यू : १० जुलै , २०१३)
१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट१९८४)
१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर, १९९९)
१९५५: संगीतकार राजेश रोशन यांचा जन्म.
१९७३: भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक शिरीष कुंदर यांचा जन्म.