उद्धव ठाकरे ओवेसींसोबतही आघाडी करू शकतात-बावनकुळे

0

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (BJP State President Chandrashekhar Bawankule) उद्धव ठाकरे यांची शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर भाष्य केले आहे. या युतीचा कुठलाही परिणाम होणार असून ठाकरे यांनी भीमशक्तीशी नव्हे तर एका गटाशी युती केली आहे. ठाकरे यांचे कार्यकर्तेही या युतीमुळे नाराज असून येत्या काळात अनेक कार्यकर्ते त्यांची साथ सोडतील, असा दावा आमदार बावनकुळे यांनी केलाय. सत्ता गेल्यापासून ठाकरे अस्वस्थ आहेत, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या आम्ही लढत असलेल्या चारही जागा जिंकू, असा दावाही बावनकुळे यांनी केला आहे. नागपूर, अमरावतीमध्ये चांगला प्रतिसाद असून कोकणातही आम्ही मोठी मजल मारली आहे. तर नाशिकबद्धल अद्याप निर्णय झालेला नसून सत्यजीत तांबे यांनी अद्याप भाजपकडे समर्थन मागितले नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंनी बाळासाहेबांच्या नावाने मते घेतली. मात्र अडीच वर्षात त्यांना विधिमंडळात शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र लावता आले नाही. काल विधिमंडळात तैलचित्र लावण्याचा कार्यक्रम झाला. त्या कार्यकर्माला उद्धव ठाकरे व त्यांच्या कुटुंबीयांनी उपस्थिती लावली नाही. त्यांनी संकुचित मनोवृत्ती दाखविली, अशी टीका करून बावनकुळे म्हणाले, मी पक्षाला कुलूप लावेन पण काँग्रेस सोबत जाणार नाही, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. मात्र, तरीही उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससी आघाडी घेतली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेससोबत ते जाऊन बसले आहेत. अडीच वर्ष त्यांनी सत्तेचा उपभोगही घेतला, असे बावनकुळे म्हणाले.