एकनाथ शिंदेंच्या बंडाला बिल्डर अजय आशर यांनीच आर्थिक रसद पुरविली, ठाकरे गटाचा आरोप

0

मुंबई: राज्यात सहा महिन्यांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी होऊन राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत झालेल्या बंडाला एका बिल्डरने आर्थिक रसद पुरविल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाने याबाबत अजय आशर यांच्यावर अंगुलीनिर्देश केले आहेत. राज्य सरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात स्थापन केलेल्या ‘मित्र’ या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर (Ajay Ashar) यांची नियुक्ती केली आहे. शिंदे सरकारने मदतीची परतफेड केली असा दावा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आलाय. अजय आशर हे मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय असल्याचे त्यात म्हटले आहे. .नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मित्र’ म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन Maharashtra Institute of Transformation या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी अजय आशर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशर यांच्यासाठीच ‘मित्र’ची स्थापना करण्यात आली असावी, असा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. राज्यात एकापेक्षा एक वरचढ असे तज्ञ, आर्थिक क्षेत्रातील जाणकार, उद्योग क्षेत्रातील महारथी असताना मुख्यमंत्र्यांनी या पदावर आशर यांची नेमणूक करण्यात आल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. अजय आशर यांच्या गुजरात संबंधानेच महाराष्ट्रातील फुटीर आमदारांना सुरतचा मार्ग दाखवला, असा ठाकरे गटाचा आरोप आहे. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष Ashish Shelar आशीष शेलार यांनी पूर्वी विधानसभेत आशर यांच्यावर टीका केली होती. ते एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप शेलार यांनी पूर्वी केला होता. आता भाजपला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी भाजपला न जुमानता घेतल्याचे ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रात नमूद केले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा