केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

0

 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Threatening Call to Transport Minister Nitin Gadkari) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकीचा फोन त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आल्याची माहिती आहे. फोन करणाऱ्याने मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे, असे सांगत धमकी दिली. नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
गडकरी यांना धमकी येण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी गडकरी यांच्या नागपुरातील कार्यालयात दोनदा धमक्यांचे फोन आले आहेत. गडकरी यांच्याकडे 10 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. धमक्या देणाऱ्या कुख्यात जयेश पुजारी याला पोलिसांनी कर्नाटकमधील बेळगाव येथील कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या होत्या.