तलाठी पदभरती विरोधात विद्यार्थी आक्रमक

0

, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अमरावती – तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टीसीएस आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्यात, या मागणीसाठी आज युवक दिनी युवक रस्त्यावर उतरले होते. यावेळी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ. अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी मागण्यांचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. यावेळी काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकुर यांनी मोर्चाला पाठींबा देत विद्यार्थ्यांची भेट घेतली.