नागपूर जिल्ह्यातही सोन्याचे साठे!

0

कुही, भिवापुरात मौल्यवान धातू
नागपूर. चंद्रपूरसह (Chandrapur ) महाराष्ट्राच्या (Maharashtra ) दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असल्याची माहिती दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली. त्यानंतर या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपूरच काय निसर्गाने अवघ्या विदर्भाला भरभरून दाण दिले आहे. इथल्या जमिनीत कोळशापासून ते मँगनीजपर्यंत मोठी खनिजसंपत्ती आढळते. मात्र, आता नागपूर जिल्ह्यात सोन्याचा साठाही दडल्याचा दावा (claimed that gold reserves are also hidden in Nagpur district ) जीएसआय अर्थात भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियाने केला आहे. विदर्भाच्या जमिनीत काय दडले आहे याचा शोध लावला आहे. चंद्रपूरला सोन्याच्या खाणी असल्याची चर्चा सुरू असतानाच नागपूर जिल्ह्यातही मुबलक प्रमाणात सोन्याचे साठे असल्याचा अंदाज भूगर्भ सर्वेक्षण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम ब्लॉकमध्ये परसोडीच्या परिसरात सोन्याचे मुबलक साठे असल्याचे जीएसआयने नमूद केले आहे.
नागपूर जिल्ह्यात परसोडीसह किटाळी, मरुपार आणि भंडारा जिल्ह्यात भीमसेन किल्ला पहार येथे सोन्याचा खजिना असल्याचे जीएसआयच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. जीएसआयने परसोडी भागात तपशीलवार सर्वेक्षण करून चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मौल्यवान धातूचे साठे असल्याची शक्यता वर्तविली आहे. भिवापूर परिसरातही सोन्याचे साठे असण्याची शक्यता आहे, पण त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अंदाज आहे. या भागात खोदकाम करण्याचा सल्ला जीएसआयने राज्य सरकारकडे अहवालाद्वारे दिला होता. मात्र, कालपरत्वे या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले.
विशेष म्हणजे, जीएसआयने नागपूर विभागात इतर मौल्यवान धातूंचे साठे असल्याचे अहवालात नमूद केले होते. यापैकी परसोडीच्याच परिसरात तांब्याचेही साठे आहेत. यासह कुही, खोबना परिसरात मोठ्या प्रमाणात टंगस्टनचे साठे असल्याचे नमूद केले आहे. याशिवाय नागपूर जिल्ह्यातच रानबोरी, भावनेरी भागात झिंक धातूचे साठे आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली बेल्टमध्ये निकेल, कोबाल्ट, क्रोमाइट, प्लॅटिनम या गटातील धातूंचे मुबलक साठे आहेत. भारतच नाही, तर आशिया खंडात अशा प्रकारच्या धातूचे साठे असल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. देशात बस्तर खोरे हे मौल्यवान धातूंसाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाचा गडचिरोली, भंडारा व नागपूरचाही प्रदेश या खोऱ्यात येतो. त्यामुळे जीएसआयने सर्वेक्षण केलेल्या साइटवर पुन्हा सर्वेक्षण करून, खोदकाम करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कोणत्या ठिकाणी कोणता धातू?
भिवापूरच्या परसोडी, किटाळी, मरुपार ब्लॉकमध्ये सोन्याचे साठे.
परसोडी भागातच तांब्याच्या खाणी.
कुही, खोबना या भागात टंगस्टनचे साठे.
रानबोरी, भावनेरी भागात झिंकच्या खाणी.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा