पत्रामुळे सुटका नाही, हे धंदे बंद करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर

0

अमरावती. देशातील विरोधी पक्षातील ९ बड्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर (Misuse of central investigative agencies ) होत असल्याची तक्रार केली आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यंत्रणांचा कुठेही गैरवापर होत नाही. जे गैरमार्गाने पैसे कमावतात. त्यांच्यावरच कारवाई होत आहे. यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. असे पत्र लिहून कुणाचीही सुटका होणार नाही. यावर एकच उपाय आहे. भ्रष्टाचार आणि गैरमार्गाने कमावलेला पैसा, हे सगळ बंद केले पाहीजे, या शब्द फडणवीस यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत पत्र लिहिणाऱ्या नेत्यांवरही निशाणा साधला आहे. या पत्राचारावरून नजिकच्या काळात देशभरात राजकारण पेटण्याची चिन्हे दिसून येत आहे. अशात फडणवीस यांनी दिलेले प्रत्यूत्तर एकप्रकारे सूचक इशाराच मानला जात आहे.
२०१४ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून ज्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांची चौकशी करण्यात आली आहे, त्यांना अटक करण्यात आली आहे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी छापे टाकले आहेत ते बहुतांश विरोधी पक्षांशी संबंधित आहेत. विशेष म्हणजे ज्या नेत्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यांच्याविरुद्ध तपास मंदावला आहे, अशी तक्रार देशातील विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सोबतच सीबीआय आणि ईडीचा विरोधकांविरोधात वापर होत असल्याचे सांगतानाच या पत्रातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी यांच्यासह ९ नेत्यांनी पत्रावर सही केली आहे. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपमध्ये आल्यावर कुणाचीही कारवाई बंद झाली नाही, असे असेल तर विरोधकांनी उदाहरण द्यावे. कारवाई चुकीची झाली असेल तर न्यायालय आहे. तिथे न्याय मिळेल. विरोधी पक्षातून भाजपमध्ये कोणी प्रवेश केला तर त्यांची चौकशी बंद होते, असे नाही. कुणाचीही चौकशी बंद झाली नाही असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.