

विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनचा उपक्रम
नागपूर(Nagpur): विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन (VMV) तर्फे उद्योजकांसाठी “इंडियाज मोमेंट: हाऊ टू बिल्ड स्केलेबल, डिजिटल अँड डीसरप्टिव्ह बिजनेस” या विषयावर उद्योजक के. गणेश(K.Ganesh) यांचे व्याख्यान शनिवार, २२ जून २०२५ रोजी सकाळी 10.30 वाजता कविकुलगुरू हॉल, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड(PERSISTENT SYSTEMS LIMITED)येथे आयोजित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध सीरियल उद्योजक, मास्टरिंग डिसर्पशनचे लेखक, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस आणि आयआयएम बंगळुरू येथील अॅडजंक्ट फॅकल्टी आणि बिगबास्केट, ब्लूस्टोन, होमलेन, पोर्टिया मेडिकल सारख्या अग्रगण्य उपक्रमांचे प्रवर्तक के. गणेश यांच्याशी उद्योजकांना विशेष संवाद साधता येणार आहे.
सुमित प्रीथ्यानी आणि वरुण अग्रवाल हे प्रकल्प संचालक असून सूत्रसंचालन युसूफ मास्टर करतील. या कार्यक्रमाला रोशन रिअल इस्टेट – कॉर्पोरेट रिअल इस्टेट कन्सल्टंट्स, ब्रेड्स एन बियाँड याचे सहकार्य लाभत आहे. याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीनगर येथील दि सेवन हॉटेल मध्ये स्टार्ट-अप शोकेस सेशन आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमात निवडलेल्या स्टार्ट-अप्सना श्री. के. गणेश यांच्या समोर त्यांचे पिच डेक्स सादर करण्याची संधी मिळणार आहे. इच्छुक स्टार्ट-अप्सनी व्हीएमए सचिवांशी संपर्क साधून नोंदणी करावी.