ब्रह्मपुरीत नवीन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0

ब्रह्मपुरीः ब्रम्हपुरी येथील नवीन न्यायालयाच्या प्रवेश द्वारावर एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज, मंगळवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या की घातपात? याबाबत विविध तर्क लावले जात आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला (Suicide near new court building in Brahmapuri) आहे. पौर्णिमा मिलिंद लाडे ( वय २७), असे मृत तरुणीचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव येथील रहिवासी असलेली ही तरुणी ब्रम्हपुरी येथे आली होती. आज, मंगळवारी पहाटेच्या सुमारास ती तालुका न्यायालय इमारतीच्या लोखंडी प्रवेश द्वारावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आली. तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना कशामुळे झाली हे स्पष्ट झालेले नुाही. या प्रकरणाची दखल ब्रम्हपुरी पोलिसांनी घेतली असून या युवतीची पार्श्वभूमी जाणून घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगिले.
पौर्णिमा ही गडचिरोली जिल्ह्यातील कोरेगाव (चोप) येथील रहिवासी आहे. प्राप्त माहितीनुसार, ब्रह्मपुरी शहरात न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी रात्री बांधकाम करणारे कामगार कामावरून घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना न्यायालयाच्या गेटवरच तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
ती ब्रम्हपुरीमध्ये कशी व कशासाठी आली, याची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यावर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमलेली होती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर तिथे कुठलाही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नाही. तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची चौकशी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहेत. यासाठी पोलिसांचे पथक गडचिरोलीला गेले असल्याचे सांगण्यात आले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा