भारताची विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल : आ. मुनगंटीवार यांची पत्रपरिषदेत माहिती

0

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 11 वर्षाचा प्रवास

चंद्रपूर (CHANDRAPUR): मोदी सरकारचा कार्यकाळ देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. ‘विकसित भारत’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि “संकल्प से सिध्दी” या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल.हा 11 वर्षांचा प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांना साथीला घेत केला आहे.भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी या काळात करण्यात आली आहे.

11 वर्षाच्या कामगिरीची माहिती एका भाषणात देता येणे अवघड आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी(PRIME MINISTER NARENDRA MODI) यांच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी साध्य झाल्या.मोदींनी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला तर, विकासाला गती मिळते हे सिद्ध केले.भाजपा सरकार जेथे जेथे आहे, तेथे तेथे गरीबांचा विकास झाला आहे.सरकार म्हणजे सेवा, या हेतूने आता काम केले जात आहे.सुशासन ही देशाची संस्कृती बनली आहे.गेल्या 11 वर्षात भारताने अमृत काळात विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.अशी माहीती आ.सुधीर मुनगंटीवार(SUDHIR MUNGANTIWAR) यांनी एन डी हॉटेल येथे भाजपा चंद्रपूर जिल्हा तर्फे आयोजित पत्रपरिषदेत सोमवारी(दि16)ला दिली.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,जेष्टनेते चंदनसिंह चंदेल,राजेंद्र गांधी,आ.देवराव भोंगळे,डॉ मंगेश गुलवाडे व राहुल पावडे यांची उपस्थिती होती.

आ.मुनगंटीवार म्हणाले,मोदी सरकारने भारतीय राजकारणात कार्यक्षमतेचे राजकारण हा नवा शब्दप्रयोग प्रत्यक्षात आणला आहे.आपण जनतेला जबाबदार आहोत, हे लक्षात ठेऊन मोदी सरकारने कारभार केला आहे. सरकारी कारभारात पारदर्शकता आणून, वेगवेगळ्या सुधारणा करून मोदी सरकारने आपल्या नव्या संस्कृतिचा परिचय दिला आहे.2014 पूर्वी देश भ्रष्टाचाराने पोखरला होता. देशात अनेक घोटाळे घडत होते. देशात लांगुलचालनाचे राजकारण सुरू होते. मोदी सरकारने मात्र देशात विकासाचे युग सुरू केले.2014 पूर्वी सरकारी योजनांचे लाभ लाभार्थी जनतेपर्यंत पोहचत नसत. लाभार्थी जनतेला हे लाभ मिळविण्यासाठी मध्यस्थांकडे जावे लागे. मोदी सरकारने डीबीटी प्रणालीचा वापर करत सामान्य माणसाच्या थेट बँक खात्यात लाभ पोहचवण्याचे काम केले आहे.अशी माहिती त्यांनी दिली.

हे 140 कोटी भारतीयांचें श्रेय
2014 पूर्वी सामान्य माणसाला वैद्यकीय उपचारावर केल्या जाणा-या खर्चाची भिती वाटत असे. मोदी सरकारने 5 लाखापर्यंतचे वैद्यकीय उपचार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपलब्ध केले आहेत.
पूर्वी आपल्याला अनेक वस्तूंची आयात करावी लागत असे, आता मात्र मेक इन इंडियामुळे अनेक वस्तू आणि सेवांची निर्यात करत आहोत.2014 पूर्वी आपली अर्थव्यवस्था दुर्बल म्हणून ओळखली जात होती. आता आपण जगात 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत. 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे भारताची वाटचाल सुरू आहे.
गेल्या 11 वर्षात सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा साक्षीदार ठरला आहे.भारताच्या विकासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःकडे घेतले नसून 140 कोटी भारतीयांना याचे श्रेय दिले आहे.असेही आ.मुनगंटीवार म्हणाले.

गरिबीचे उच्चाटन ही प्रतिज्ञा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा केली आहे. त्यानुसार गरीब कल्याण अन्न योजना, उज्वला योजना, आवास योजना, जलजीवन मिशन, जनधन योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी अशा अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत.140 कोटी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी सामुहिक प्रयत्न करत आहेत.
मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या काळात जनता भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा अनुभव घेऊ लागला आहे.राम मंदिर निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरीडॉर मुळे मोदी सरकार विकासाबरोबरच देशाची गौरवशाली संस्कृती जपण्याला प्राधान्य देत आहे, हे दिसले आहे.जीएसटी सारख्या करामुळे व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपला आहे.370 वे कलम रद्द झाल्यामुळे देशाचे अखंडता बळकट झाली आहे.सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पना कृतीत आणून मोदी सरकारने राज्य कारभार कसा करावा, याचा आदर्श स्थापित केला आहे.असेही मुनगंटीवार म्हणाले.