नागपूर : ब्लड फॉर बाबासाहेब आंबेडकर 6 डिसेंबर रोजी या अभियानांतर्गत महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण देशभरात ऐच्छिक रक्तदान करून बाबासाहेबांना एक विशाल अभिवादन करण्यात येनार आहे , अशी माहिती पत्र परिषदेमध्ये आतिश मेश्राम व प्रवीण कांबळे यांनी दिली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून लाखोच्या संख्येने लोक एकत्र येत आहे. या दिनावर रक्तदानाच्या माध्यमातून मानवी समाजातील नैसर्गिक, समता प्रस्थापित होऊन भारतीय समाजातील स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय धर्मनिरपेक्षता या संवैधानिक मूल्यांची जपणूक करण्यास हातभार लागेल असा विश्वास व्यक्त करीत पत्रपरिषदेत प्रवीण कांबळे उयांनी माहिती दिली.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा