रजनीशकुमार शुक्ल : आचार्य पदवी प्राप्त पत्रकारांचा सत्कार सोहळा
नागपूर. आज मोठ्या संख्येने 24 तास टीव्ही चॅनल्स आहेत. सोशल मीडियाचाही बोलबोला आहे. त्यावर दिवसभर बातम्यांचा ओघ सुरूच असतो. पण, घटनेच्या सत्यापनेसाठी सकाळी येणाऱ्या वृत्तपत्रांची वाट बघितली (newspapers are awaited for verification in Morning) जाते. वृत्तपत्रांची हीच विश्वासार्हता पत्रकारितेची खरी ताकद (Credibility is the true strength of journalism) असल्याची भावना वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलपती प्रो. रजनीशमुमार शुक्ल (Prof. Rajneeshmumar Shukla, Vice Chancellor, Mahatma Gandhi International Hindi University) यांनी व्यक्त केली. हिंदी पत्रकार संघ (मध्य भारत)च्या वतने सिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये हिंदी पत्राकारितेचे जनक स्व. बाबूराव विष्णू पराडकर यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय प्रेस दिनाच्या पर्वावर आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या नागपुरातील पत्रकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माहिती आयुक्त राहुल पांडे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ संपादक विकास मिश्र, मनिकांत सोनी, संजय तिवारी, हिंदी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर पुरोहित व महासचिव मनीष सोनी उपस्थित होते.
या सोहळ्यात आचार्य पदवी प्राप्त करणारे डॉ. जितेंद्र ढवळे, डॉ. योगेश पांडे, डॉ. गणेश खवसे, डॉ. आशिष दुबे, डॉ. बबन नाखले, डॉ. राजू मिश्रा, डॉ. मोईज हक, डॉ. अनंत कोळमकर, डॉ. अतुल पांडे, डॉ. संजय डाफ, डॉ. मंगेश गोमासे यांचा सत्कार करण्यात आला.
शुक्ल पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असल्याने जगभरातील घटना घरबसल्या पाहता येतील. तो दिवस दूर नसला तरी वृत्तपत्रांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे आवाहन आहे. पत्रकारांच्या व्यक्तिगत अजचणींसोबतच पत्रकारितेपुढेही अनेक आव्हाने आहेत. असे असतानाही आजही पत्रकारितेची विश्वासार्हता कायम आहे. ती पुढेही टिकवून ठेवावी लागणारआहे. माहिती आयुक्त राहुल पांडे म्हाणाले की, पत्रकारिकतेच्या क्षेत्रात सुधारणा घडविण्यासाठी पत्रकारांच्या काम करण्याच्या स्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानासोबत पुढे चालणे गरजेचे आहे. येथील विद्यापीठांचीही कौशल्य विकासात मदत घ्यायला हवी. यावेळी अन्य वक्त्यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक मनीष सोनी यांनी तर संचालन एस. पी. सिंह यांनी केले. राजेश्वर मिश्रा यांनी आभार मानले.