कोल्हापूरः कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सध्या सीमावादावरून जोरदार शाब्दिक चकमकी होत असल्या तरी कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकाच्या मुद्द्यावरुन (Restoration of Samadhi of Shahaji Raje Maharaj) महाराष्ट्र सरकार कर्नाटकशी चर्चा करणार आहे. भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत संकेत दिले आहेत. १६६४ साली शहाजी राजेंचे होदिगेरे येथे निधन झाले. शहाजी राजेंचे समाधीस्थळ तेथेच आहे. हे समाधीस्थळ सध्या उघड्याबोडक्या अवस्थेत आहे. शहाजी महाराजांसोबत कर्नाटकात गेलेले मराठ्यांचे काही वशंज आजही नित्यनेमाने या समाधीस्थळाला भेट देतात. या समाधीस्थळाची देखभाल भारतीय पुरातत्व विभागाकडे असली तरी त्याची अवस्था चांगली नाही. त्यामुळे या स्थळाचा जीर्णोद्धा करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. समाधीचा जिर्णोद्धार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरच मंत्री चंद्रकांत पाटील हे कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन सध्या दोन्ही राज्यांमध्ये तणातणीसुरु आहे. महाराष्ट्र सरकारने सीमाभागात राहणाऱ्या लोकांसाठी योजना आणल्या आहेत. यामध्ये कर्नाटकात राहणाऱ्या लोकांना मराठी शिकण्यास मदत होणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. सरकार सीमाभागातील नागरिकांसाठी काही विशेष योजना आखत आहोत. मुंबईत त्यासंबंधी बैठका घेत आहोत. शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहोत. स्मारकासाठी आवश्यक असलेली रक्कम कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. यातून दोन्ही राज्यांतील कटुता कमी होऊन सहकार्याची भावना वाढीस लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शहाजी राजेंच्या कर्नाटकमधील समाधीचा जिर्णोद्धार होणार, राज्य शासनाचे प्रयत्न
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा