सुरजागड लोहखनिज प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा ऐल्गार

0

वंचित बहुजन आघाडीचे चक्का जाम आंदोलन : नुकसान भरपाई, रोजगार देण्याची मागणी
गोंडपीपरी. सुरजागड लोहखनिज प्रकल्पाच्या (Surjagad iron ore project) वाहनांच्या वाहतुकीमुळे गोंडपीपरी शहरात अनेक अपघात घडले. त्यात काहींना जीव ही गमवावा लागला. त्यासोबतच जडवाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याविरोधात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ऐल्गार पुकारला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, जड वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी तसेच गोंडपीपरी शहरातील स्थानिक युवकांना सुरजागड प्रकल्पात रोजगारात प्राधान्य देण्यात यावे अश्या विविध मागण्यांसाठी वंचित बहूजन आघाडीचे (Vanchit bahujan aghadi) जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात गोंडपीपरी शहरातील मुख्य मार्गावर चक्का जाम आंदोलन (Chakkajam andolan) करण्यात आले. मुख्य मार्गावरील वाहतूक रोखून धरत शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.
सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकणी रस्त्यांची अगदी चाळण झाली आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागत आहे. वारंवार तक्रार करूनही सस्यांची दखल घेतली जात नाही. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्य रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी गोंडपीपरी शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, वेग नियंत्रक लावण्यात यावे, सोबतच वाहन शहरात येतांना व जातांना वाहनचालकांची मद्यपान चाचणी प्रामुख्याने करण्यात यावी, अश्या विविध मागण्या यावेळी वंचित बहूजन आघाडी तालूका गोंडपीपरीच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी वंचित बहूजन आघाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष प्रकाश तोहोगावकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण रामटेके, अनिल दुर्गे, युवा कार्यकर्ते अविनाश राऊत, राजकपूर भडके व अनेक कार्यकर्त्यांसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
चक्का जाम आंदोलनाने बराच वेळ मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मागण्यांची तातडीने पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन वंचित आघाडीने दिला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा