१००, १० व ५ च्या नोटा होणार बंद ? आरबीआयचे महत्त्वाचे अपडेट

शात १००, १० आणि ५ च्या जुन्या नोटा बंद करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आहे. गेल्या काही दिवसांपासून १००, १० व ५ नोटा बंद होणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावे वाऱ्यासारखी पसरत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांचे नाव या बातमी व्हायरल होत आहे. परंतु या बातमीवर आता रिझर्व्ह बँकेनं एक स्पष्टीकरण दिलं आहे. १००, १० व ५ च्या नोटा होणार बंद करण्यासंदर्भातकोणताही निर्णय झाला नाही. असे आरबीआयने स्पष्ट केलं आहे. PIBनेही त्याबाबत एक ट्वीट करुन माहिती दिली आहे.

एक खबर में दावा किया जा रहा है कि आरबीआई द्वारा दी गई जानकारी के अनुसार मार्च 2021 के बाद 5, 10 और 100 रुपए के पुराने नोट नहीं चलेंगे।#PIBFactCheck: यह दावा #फ़र्ज़ी है। @RBI ने ऐसी कोई घोषणा नहीं की है। pic.twitter.com/WiuRd2q9V3

— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 24, 2021

RBIने स्पष्ट केलंय की 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व नोटा वैध आहेत आणि ते चलनात कायम राहतील. त्यामुळे सध्या या नोटा चलनातून बाहेर करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे मार्च आणि एप्रिलनंतरही 5, 10 आणि 100 रुपयांच्या जुन्या नोटाही बाजारात सुरु राहतील. दरम्यान RBI कडून 5, 10 आणि 100 रुपयांच्या नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. बाजारात सध्या नव्या आणि जुन्या नोटा चालू आहेत. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, बी महेश यांनी डिस्ट्रिक्ट लेवल सिक्युरिटी कमिटीमध्ये याबाबतची एक माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी १००, १० व ५ च्या जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा आधीच बाजारात आल्या असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे १००, १० व ५ च्या जुन्या नोटा जरी बाजारात बंद करण्यात आल्या तरी नागरिकांना काहीचं अडचण येणार नाही. नोटाबंदी दरम्यान नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे आरबीआय सध्या जितक्या जुन्या नोटा सर्कुलेशनमध्ये आहेत त्याबदल्यात नव्या नोटा बाजारात आणण्याचा विचार करत आहे. त्यामुळे नागरिकांनाही अडचणी येणार नाहीत आणि नोटाही अचानक चलनातून बंद होणार नाहीत.

नोटाबंदीनंतर आरबीयाने २०००, ५००, २००, १००, ५०, २०, १० आणि ५ रुपयांच्या नव्या नोटा जाहिर केल्या, परंतु त्याबरोबरच जुन्या नोटाही वैध ठरवल्या त्यामुळे आजही जुन्या नोटा या चलनात वापरल्या जात आहेत. RBI कडून 5 जानेवारी 2018 ला 10 ची नोट जारी करण्यात आली होती. जुलै 2019 मध्ये 100ची नवी नोट जारी करण्यात आली होती. त्याचबरोबार 20 रुपयांची नवी नोटही चलनात आणली. तर 50 ची नवी नोट 18 ऑगस्ट 2017 ला जारी करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2017 ला 200 रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली होती. नोटबंदीनंतर लगेच 10 नोव्हेंबर 2016 ला 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. त्याच दिवशी 2000 रुपयांची नोटही जारी करण्यात आली होती. परंतु ५०० आणि १००० नोटाबंदीमुळे नागरिकांना खूपचं त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे त्यानंतर आरबीआय नवी नोटा चलनात आणण्यापूर्वी नियोजनरित्या काम करत आहे. नकली नोटांना आळा घालण्यासाठी आरबीआयकडून काही काळानंतर जुन्या नोटा चलनातून हळूहळू बाद करत त्या जागी नव्या नोटा बाजारात आणल्या जात असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.