नव्या रडार यंत्रणेसह 123 तेजस वायुसेनेत दाखल होणार /123 Tejas will be part of Air force with new radar system

Share This News

नवी दिल्ली: स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ विमानांमध्ये इस्त्राईली रडारच्या ऐवजी स्वदेशी बनावटीची ‘उत्तम’ रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहे. नव्या रडार यंत्रणेसह सुसज्ज असलेली 123 ‘तेजस’ लढाऊ विमाने लवकरच भारतीय वायुसेनेत दाखल होणार आहेत. डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी ही माहिती दिली.यासंदर्भात रेड्डी यांनी सांगितले की, मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. त्यानुसार डीआरडीओच्या बंगळुरुमधील एलआरडीई प्रयोगशाळेने हे रडार विकसित केलेय. तेजसच्या निर्मितीमध्ये सुमारे 65 टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा हिंदुस्थान एरोनॅक्स लिमिटेडचा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे एचएएलला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे. भारतीय वायुसेनेला लवकरच 123 ‘तेजस’ फायटर जेट मिळणार आहे. त्यात 40 विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. तर 93 तेजस मार्क-1ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या 40 तेजस विमानांमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, 83 तेजस मार्क-1ए एईएसए रडार यंत्रणा असेल. तेजस मार्क-1ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्यासाठी हिंदुस्थान ऍरोनॅटिकल लिमिटेडशी सामंजस्य करार केल्याचे रेड्डी यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.