देशात १३,२0३ नवे कोरोनाबाधित, १३१ मृत्यू

Share This News

नागपूर – ३२२
गडचिरोली – ३
चंद्रपूर – २३
भंडारा – १३
यवतमाळ – ५८
अमरावती – ७४
वाशीम – १२नागपुरात १२८ पॉझिटिव्ह, सहा बळी
नागपूर : जिल्ह्यात नव्याने केवळ १२८ बाधितांचीच नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक दिवसानंतर जिल्ह्यात एका दिवसात इतक्या कमी बाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात २७९७ चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी शहरातून ९९, ग्रामीणमधून २६ तर जिल्ह्याबाहेरील ३ अशा नव्याने १२८ बाधितांची आज नोंद करण्यात आली. यामध्ये रॅपिड अँन्टिजेन तपासणीव्दारे १३ लोकांचे अहवाल सकारात्मक आलेत. एम्समधून १७ , मेयोतुन २७, मेडिकलमधून १७, नीरीच्या लॅबमधून १४, खासगी प्रयोगशाळेतून २४ तर नागपूर विद्यापीठाच्या विषाणू प्रयोगशाळेतून १६ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. दिवसभरात शहरातील १, ग्रामीणमधील २ व नागपूर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा मृत्यू झाला. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ४१३३ वर पोहचली आहे.
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात आणि देशव्यापी कोरोना लसीकरणानंतर गेल्या २४ तासांत भारतात १३,२0३ नवे कोरोना रुग्ण आढळले असून १३१ नागरिकांचा मृत्य झाला आहे. १३,२९८ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात एकूण सक्रिय रुग्ण संख्या १,८४,१८२ झाली आहे. एकूण १,0३,३0,0८४ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,५३,४७0 पोहचला आहे. आतापयर्ंत देशात १६,१५,५0४ नागरिकांचे लसीकरण झाले.

Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.