मोदींच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला घसघशीत मदत : फडणवीस

केंद्राच्या अर्थसंकल्पावर विविध प्रतिक्रिया आल्या. अर्थसंकल्प न वाचता महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही, निवडणुकीच्या राज्यांचा अर्थसंकल्प अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या. म्हणून मी स्वत: अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन, त्यातून महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्रावर अन्याय झालाय का, याची माहिती मी घेतली. या अर्थ संकल्पात महाराष्ट्राला केंद्र सरकारने घसघशीत मदत देण्यात आल्याचा दावा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आली, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य 3 लाख 5 हजार 611 कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पाच ते सातपट जास्त मदत”

मुंबईत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात मोदी सरकार महाराष्ट्राला प्रत्येक वर्षी पाच ते सातपट जास्त मदत मिळत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“राहुल गांधींनी बजेटमधील पाच आकडे सांगावेत”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अर्थसंकल्पाविषयी कोणीतरी प्रतिक्रिया लिहून देतं आणि ते वाचून दाखवतात, त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी वेगवेगळे आकडे सांगितल्याचं गेल्या वेळी पाहिलां. त्यांनी बजेटमधील कोणतेही पाच आकडे सांगावेत, आम्ही प्रतिक्रिया देऊ, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.