नागपूर : (NAGPUR)महात्मा ज्योतिबा फुले यांनी18 व्या शतकात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतुन समस्त मानवाला बाहेर काढण्याचं काम केले. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटवली, क्रांती घडवली. ज्योतीबा (Mahajyoti)आपल्याला उजेडाच्या वाटा देणारे क्रांतीसूर्य झाले. आज क्रांतीसूर्याचा विचारांचा वारसा आपल्याला चालवायचा असल्याचे आणि त्यासाठी आपण सारे प्रतिबध्द असल्याचे प्रतिपादन महाज्योतीचे व्यवस्थापकिय संचालक राजेश खवले यांनी केले. (Mahatma Jyotiba Phule)महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त महाज्योतीच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे (Kunal Shirasathe)यांनी प्रारंभी महाज्योतीची भूमिका विशद करताना महाज्योती आपल्या प्रशिक्षण आणि कौशल विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी पल्लवी कुकुडकर, प्रसन्न देशपांडे, सुनीता झाडे यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांवर मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर सहाय्यक लेखाधिकारी जयश्री बोदेले, प्रशिक्षक, सर्व वर्गाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मा गजभिये यांनी केले तर उपस्थिताचे आभार पंकज पचारे यांनी मानले.
ग्वावा ज्यूस आणि ड्रायफ्रूट मिल्क स्मूदी |Guava juice recipe |Dry Fruit Milk Smoothie Recipe|Ep- 110