

पुलवामा प्रकरणात कारवाईची मागणी
नागपूर : (NAGPUR)जम्मू कश्मीर(JAMU KASHMIR) चे भूतपूर्व राज्यपाल सतपाल मलिक यांनी (PULWAMA)पुलवामा घटनेसंदर्भात दिलेल्या वक्तव्यामुळे केंद्र सरकारविरुद्ध निर्माण झालेल्या संशयास्पद परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहर जिल्हा कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष, आमदार(VIKASH THAKARE)विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात जिलाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी एक निवेदन सादर करून या प्रकरणात सखोल चौकशी आणि उचित कारवाई करण्याची मागणी प्रकर्षाने करण्यात आली. काॅंग्रेसचे प्रदेश पदाधिकारी संदेश सिंगलकर, विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, उमेश डांगे, गिरीश पांडव, प्रशांत धवड, रमण पैगवार, प्रदेश प्रतिनिधी, जिल्हा कांग्रेस पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, फ्रंटल अध्यक्ष, फ्रंटल पदाधिकारी, सेल अध्यक्ष, सेलचे पदाधिकारी, कांग्रेसजन यावेळी उपस्थित होते.चिकन भुना मसाला आणि हॉट हनी चिकन टॅकोस|Chicken Bhuna Masala Recipe|Honey Chicken Tacos Recipe|Ep-112