नागपूर: (NAGPUR)केंद्रीय मंत्री (NITIN GADKARI)नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असुन जयेश हा PFIआणि लष्करसाठी काम करत होता. तो एक गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा. एका मुलीचा तो अकाऊंट होता अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.जयेश हा बेळगाव जेलमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता. परंतु त्या आधीच तो PFI संघटनेचा संपर्कात आला. जयेशचा PFI या संघटनेसाठी अजुन कोणत्या घटनात सहभाग राहिला आहे. त्याची चौकशी पोलीस आता करणार आहेत. नागपुर पोलिसांच्या आज तीन टीम तपासासाठी नागपूरवरून निघणार आहे. यातील दोन टीम बेळगाव आणि (Bangalore)बंगळूर इथल्या जेल मध्ये जाऊन तपास करणार असून तिसरी टीम पैसे जमा करण्यास सांगितले त्या अकाउंट बदल माहिती गोळा करणार असल्याची माहिती मिळाली.