विश्‍वकेसरी फाउंडेशनतर्फे भगवान परशुरामाची महाआरती

0
37

ब्राह्मण समाजातील गरजू आणि गरीब बांधवांना शैक्षणिक आरोग्य मदतकार्य करण्याचे कार्य करणा-या विश्वकेसरी फाऊंडेशन तर्फे भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्‍त श्रीराम मंदिर जयप्रकाश नगर (Shri Ram Mandir Jayaprakash Nagar )येथे भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली.

यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्‍कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंकज चांदे (Kavikulguru Former Vice Chancellor of Kalidas Sanskrit University Pankaj Chande), श्वेता शेलगावकर (Shweta Shelgaonkar), वैशाली भांगे ( Vaishali Bhange), अरविंद बर्गी (Arvind Bergi), संतोष देशपांडे (Santosh Deshpande), नारायण जोशी  (Narayan Joshi)आणि शरद वडोदकर (Sharad Vadodkar)यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

ब्रम्हवृंदांचा सामूहिक मंत्रोच्‍चार व शंखनाद करण्‍यात आला. भगवान परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय तृतीयेच्‍या मुहूर्तावर डॉ. अशोक देशपांडे (Dr. Ashok Deshpande)यांनी सेलूजवळ कोलगाव जिल्हा वर्धा (Kolgaon District Wardha near Selu) येथील त्यांचा मालकीची १ एकर जागा विश्वकेसरी फाऊंडेशनला दान दिली. या जागेवर विदर्भातील भगवान परशुराम धाम आणि नक्षत्रवन उभारण्‍याचा संस्थेचा मानस आहे. कार्यक्रमाचे निवेदन सायली लाखे पिदळी यांनी केले. विश्वकेसरी फाऊंडेशनची चमू व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा