शेतकऱ्यांचा रोष, सरकारचे केले श्राद्ध

0
40

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

बुलढाणा (Buldhana). अनोखे आणि तेवढेच तीव्र स्वरूपाच्या आंदोलनांद्वारे साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shektari Sangathana) ओळखली जाते. अक्षय तृतीयेचे निमित्त साधून (On the occasion of Akshaya Tritiya ) शनिवारी संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात (Sangrampur Tehsil Office Premises ) सरकारचे श्राद्ध घालून रोष व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा नैवेद्य व पान टाकत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. शेतकऱ्यांशी संबंधित मागण्या यावेळी आंदोलकांनी रेटून धरल्या.

जिल्ह्यातील १५ दिवसांपासून बंद असलेले शासकीय हरभरा खरेदी केंद्रे चालू करा, खरिपातील लाल कांद्याला अनुदान घोषित केले त्याच धरतीवर विदर्भातील शेतकऱ्यांच्या उन्हाळी कांद्याला अनुदान द्या. संग्रामपूर, जळगाव तालुक्यात चक्री वादळाने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून आपत्तग्रस्तांना घरे बांधकामासाठी निधी द्या. शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या पीक विमा कंपन्यांवर कारवाई करून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करा. सततच्या पाऊस व अतिवृष्टिने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई वाटप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

तहसील कार्यालयाच्या गेटसमोर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र लावून व प्रशासनाच्या नावाने केळीच्या पानावर सर्व वस्तूंसह नैवेद्य दाखवण्यात आला. राळ, कापूर व धूप अगरबत्ती करून सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दोन दिवसांत निर्णायक भूमिका घ्यावी अन्यथा मुंबई विधान भवनासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर (Swabhimani Vidarbha President Prashant Dikkar)यांनी दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते उज्ज्वल पाटील चोपडे (Ujjwal Patil Chopde), विजय ठाकरे (Vijay Thakare), सागर मोरखडे  (Sagar Morkhade), विशाल चोपडे (Vishal Chopde), रामदास सरदार (Ramdas Sardar),विलास तराळे (Vilas tarale), धनंजय कोरडे (Dhananjay Korde), अनुप देशमुख (Anup Deshmukh), राजेश उमाळे (Rajesh Umale ), श्रीकृष्ण शेजोळे (Shrikrushn Shejole), कैलास ठाकरे, अंकुश सुलताने, प्रवीण पोपळणारे, प्रफुल करांगळे, श्रीकृष्ण बोरोकार, संदेश ठोंबरे, योगेश बाजोड, हरिदास आमझरे, श्रीकृष्ण भवर, नंदू दहिकर, दीपक बोयाकेसह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा