विद्यापीठात हृदयरोग तपासणी शिबिर शुक्रवारी

0
34

नागपूर (Nagpur) -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात  (Rashtrasant Tukadoji  Maharaj Nagpur University)हृदयरोग मोफत तपासणी व निदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, दिनांक २८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आले आहे. स्वास्थ केंद्राच्या वतीने हे शिबिर विद्यापीठाचे स्वास्थ केंद्र डी. लक्ष्मीनारायण परिसर, रवी नगर नागपूर येथे होणार आहे.

विद्यापीठातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता हृदयरोग तपासणी व निदान (कार्डियो व्हस्क्युलर सिस्टीम स्क्रीनिंग कॅम्प) शिबिर होणार आहे. तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि समुपदेशन करण्यात येणार आहे. आयोजित शिबिरात कुटुंबीयांसह सहभागी होण्याचे आवाहन कुलसचिव डॉ. राजू हिवसे (Registrar Dr. Raju Hivase) व महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोज शामकुवर (Female Medical Officer Dr. Saroj Shamkuvar)यांनी केले आहे.

 

 

 

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा