पवारांच्या ‘गुगली’वर संजय राऊतांची सारवासारव

0
40

मुंबईः(Mumbai) “एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांचे वाटप, त्यामध्ये काही इश्यू याबाबत देखील पाहावे लागेल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसे सांगू?” अशी गुगली टाकत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar Statement on MVA) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. शरद पवार अमरावतीमध्ये बोलत होते. महाविकास आघाडी तुटावी, असे शरद पवारांना अजिबात वाटत नसेल, अशी अपेक्षा (thackeray group)ठाकरे गटाचे नेते (sanjay raut)संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यावर व्यक्त केली आहे. शरद पवार यांची जेपीसी आणि पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन मवाळ भूमिका घेतली असल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात (ajit pawar)अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाविषयी मोठ्या चर्चा झडताना दिसून येत आहेत. त्याआधी शरद पवार यांनी जेपीसीवरुन घेतलेल्या भूमिकेवरुनही राजकीय वर्तुळातून विरोधाचा सूर उमटला होता. काँग्रेसकडून शरद पवार यांनी जेपीसीबाबत घेतलेल्या भूमिकेला विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत केलेले वक्तव्य आघाडीत अवस्थता निर्माण करून गेले आहे.

पवार म्हणाले, केंद्र सरकार फोडाफोडीचे राजकारण (political)करत आहे. भाजपला त्यांचे काम करू द्या. आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही योग्य वेळ आल्यानंतर घेणार आहोत, असेही पवार म्हणाले.
राऊत काय म्हणाले

दरम्यान, पवारांच्या वक्तव्यावर (sanjay raut)संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अनेकदा (sharda pawar)शरद पवार यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जातो. महाविकास आघाडी स्थापन करण्यात शरद पवार यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटावी, असे शरद पवारांना अजिबात वाटत नसेल. या क्षणी मविआ मजबूत आहे. त्यामुळेच राज्यभरात आम्ही तिन्ही पक्ष एकत्र सभा घेत आहोत. आम्ही एकत्र आहोत, हे सांगण्यासाठीच या सभा घेत आहोत, असेही ते म्हणाले.

 

पुडाची वडी आणि नारळ आळीव लाडू | How to make Pudachi Vadi | Coconut Aliv Ladoo Recipe | Ep- 115 |

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा