HarshVardhan Sapkal खारघर घटनेसंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा- हर्षवर्धन सपकाळ

0
32

अकोला AKOLA  – खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटने संदर्भात जबाबदार असलेल्या राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सचिव हर्षवर्धन सपकाळ (HarshVardhan Sapkal)  यांनी आज केली आहे. स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले खारघर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या घटनेमध्ये 14 नव्हे तर 50 पेक्षा जास्त सदस्यांचा मृत्यू झालेला आहे.त्यामुळे सरकारने या संदर्भात स्वतःची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (EKNATH SHINDE DEVENDRA FADNAVIS) यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. इतका मोठा कार्यक्रम घेताना नियोजनाचा अभाव सरकारच यामध्ये दोषी असल्याचेही त्यांनी यावेळी सूतोवाच केले.25 लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी 13 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा खर्च या कार्यक्रमासाठी झाला आहे सरकारने हा खर्च करण्याचा उद्देश्य काय (BJP) भाजपच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यांचे मन राखण्यासाठी तसेच स्वतःची वोट बँक निर्माण करण्यासाठी सरकारकडून हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. त्यामुळे याला सर्वच जबाबदार हे सरकारच आहे सरकारने या संदर्भात पाच लाख रुपयांची तुटपुंजी मदत केली या संदर्भात आपली जबाबदारी स्वीकारावी असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

https://youtu.be/5O7LbefTEcM

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा