महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुप्रिम कोर्टात शुक्रवारी सुनावणी

0
34

नवी दिल्ली (NEW DELHI)  दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने 7 महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. कुस्तीपटूंनी याचिकेत केलेले लैंगिक छळाचे आरोप गंभीर असून या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. या प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी होणार (Women wrestlers agitation on Jantar Mantar) आहे. न्यायालयाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर न नोंदवल्याबद्दल दिल्ली पोलिसांना नोटीसही बजावली आहे. 7 महिला तक्रारदारांची नावे उघड होऊ नये, यासाठी ती न्यायालयीन रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी सात महिला कुस्तीपटूंनी याचिका दाखल केली आहे.
दिल्लीच्या जंतरमंतरवर मंगळवारपासून आंदोलन सुरु झाले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या निरीक्षण समितीच्या सदस्या कुस्तीपटू विनेश फोगट यांनी नमूद केले की तपास योग्य पद्धतीने झालेला नाही. मला अहवाल देखील वाचायला दिला नाही. बबिता फोगट म्हणाल्या की, हा अहवाल सर्वांच्या संमतीने तयार झालेला नाही. तपास अहवाल वाचत असतानाच माझ्या हातून तो हिसकावण्यात आला. साईचे संचालक आणि चौकशी समितीचा भाग असलेल्या राधिका श्रीमन यांनीही माझ्यासोबत गैरवर्तन केले. माझ्या अनेक मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले. त्या अहवालात मी माझा आक्षेप नोंदवला आहे.

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा