अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी माझ्या सुटीबद्धल बोलू नये-मुख्यमंत्री

0
40

साताराः(satara) सुटीवर असल्याच्या कारणापायी टीका करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये. मी सुट्टी घेतलेली नाही तर अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवलेले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला (CN Eknath Shinde on Uddhav Thackeray) लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. दोन दिवसांपासून ते त्यांच्या मूळ गावी मुक्कामी असून तिथे हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी जात आहे. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना टीका करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये, अशी कडवट टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, मागील दोन दिवसांपासून मी गावाकडे आहे. येथेही मला भेटण्यासाठी हजारो लोक येत आहेत. त्यांच्या समस्या मी ऐकून घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही मी घेऊन काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच माझ्या परिसरात पर्यटनवाढीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पाहणी केली आहे. मी माझ्या गावी आलो. याच्यावरुन विरोधक टीक करत असतील तर ते गैर आहे. बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, म्हणून काहीही बोलू नये. माझ्याकडेही बोलण्यासारखे खूप शब्द असल्याचे शिंदे म्हणाले.

गेल्या सहा महिन्यांपासून भाजप-सेना युती म्हणून आम्ही काम करीत आहोत. असंख्य प्रश्न, समस्या मार्गी लावल्या आहेत आणि लावत आहोत. सहा महिन्यात आम्ही एवढे काम केले आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच म्हणजे आमची (BJP)भाजप-सेना युती निवडणूक जिंकेल व आम्ही पुन्हा सत्तेत असू, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

 

बॉम्बोलोनी | How to Make Bomboloni Recipe | Donut Bomboloni Recipe | Ep-116 | Shankhnaad News |

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा