“माझ्या ह्रदयात विखे पाटीलच दिसतील…”, अब्दुल सत्तारांकडून स्तुतिसुमने

0
35

मुंबईः (mumbai)“राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी मुख्यमंत्रीच काय, त्यापेक्षाही पुढे जावे”, अशा शुभेच्छा देताना “माझी छाती चिरून दाखवली, तर माझ्या हृदयात राधाकृष्ण विखे-पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) दिसतील”, या शब्दांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी विखे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात असून अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य त्याच संदर्भातून पाहिले जात आहे. “कदाचित मी एखादा हनुमान महाराजांसारखा त्यांचा एखादा भक्त असतो, तर छाती चिरून दाखवले असते की, माझ्या ह्रदयात राधाकृष्ण विखे-पाटील आहेत…” उल्लेखही सत्तारांनी केलाय.

मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी विखे यांच्याकडे सोपविली जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांवर आपात्रतेची कारवाई झाल्यास राजकीय संकट निर्माण होऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढविले जात आहेत.

 

 

 

 

बॉम्बोलोनी | How to Make Bomboloni Recipe | Donut Bomboloni Recipe | Ep-116 | Shankhnaad News |

 

शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी येथे क्लिक करा